
जळगाव – जळगाव शहर मतदार संघातील राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांचे प्रचारा दरम्यान शहरात ठिकठिकाणी औक्षण करण्यात येत आहे.यामुळे राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीच्या प्रचाराला शहरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.


कॉर्नर मिटिंगवर भर…
आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांनी जळगाव शहर मतदार संघात प्रचार करतांना प्रचार रॅली, मतदारांच्या वयक्तिक भेटीगाठी सह विविध भागात कॉर्नर मिटिंगवार भर देत मतदारांशी संवाद साधत आहे.
सत्ताधारी भूल भुलाय्या….
जळगाव शहरातील मतदारांना सत्ताधारी नुसते फसवीत आहे.शहरात कुठलेच ठोस विकास काम नाही.. विकासाच्या नावावर हे सरकार भूल भूलय्या आहे. यांना वेळीच ओळखा व राज्याच्या विकासासाठी राष्ट्रवादीचे हात बळकट करा… सेवेची एक संधी द्या… जळगाव शहराचा विकास काय असतो हे मी तुमच्या साथीने करून दाखवील असे आवाहन देखील मतदारांशी बोलतांना उमेदवार अभिषेक पाटील यांनी केले.