जळगाव, (प्रतिनिधी) – जळगाव शहर मतदार संघातील राष्ट्रवादी,काँग्रेस महाआघाडीचे अधिकृत उमेदवार अभिषेक पाटील यांनी शहरात जोरदार प्रचाराचा सुरु केला आहे. संपूर्ण शहरात ते पायी फिरून लोकांच्या अडी-अडचणी जाणून घेत जळगावच्या विकासासाठी राष्ट्रवादीला साथ द्या असे आवाहन करत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी कालच उमेदवार यांच्या प्रचाराचे नारळ राष्ट्रवादी कार्यालयात फोडून प्रचाराचा शुभारंभ केला.त्यानंतर मात्र आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरात जोरदार प्रचार यंत्रणा राबवित आहे. आघाडीचे उमेदवार अभिषेक पाटील यांचे नागरिकांकडून ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत असून त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. शहराच्या विविध भागांमध्ये फिरून ते मतदारांच्या समस्या जाणून घेत आहेत. तसेच जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासनही देत आहेत.प्रचाररॅली प्रसंगी राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहे.