मुंबई : महाराष्ट्रातील वीजबिल वसुलीसाठी महावितरणने वेगवेगळ्या योजना आणि जनजागृती करुनही थकबाकीचा डोंगर कायम आहे. वीजबिलाचा नियमित भरणा नसल्याने महावितरणवर आर्थिक ताण वाढला आहे. यात आता राज्यातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांकडे लाखोंची वीज बिल थकित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्यातील आमदार, खासदार आणि मंत्री अशा ग्राहकांकडे असलेल्या थकित वीजबिलाची उर्जा विभागाकडून यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यातुन ही माहिती समोर आली आहे. या यादीत भाजपचे (BJP) साताऱ्याचे आमदार जयकुमार गोरे आघाडीवर आहेत. गोरे यांच्याकडे तब्बल ७ लाख रुपयांचे वीज बिल थकित आहे, मात्र अद्याप त्यांच्यावर उर्जा विभाग अथवा महावितरणाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. याशिवाय सोलापूरचे आमदार बबनराव शिंदे आणि संजय शिंदे या दोन्ही भावांकडे आणि त्यांच्या कुटुंबियांकडे तब्बल ७ लाख ८६ हजारांची थकबाकी आहे.
यामध्ये जळगाव जिल्ह्यातील दोन आमदारांचा समावेश असून त्यात शिरीष मधुकरराव चौधरी यांच्याकडे रु. ६७,९६८तर सुरेश भोळे १,३४,७८८ इतकी थकबाकी आहे.
कोणी किती बिल थकवले?
आरोग्यमंत्री राजेश टोपे – ४ लाख रुपये
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात १० हजार रुपये
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले २ लाख ६३ हजार रुपये
राज्यमंत्री विश्वजित कदम – २० हजार रुपये
माजी खासदार श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती १ लाख २५ हजार रुपये
माजी मंत्री आणि आमदार सुभाष देशमुख – ६० हजार रुपये
आमदार जयकुमार गोरे – ७ लाख रुपये
माजी गृहमंत्री आणि आमदार अनिल देशमुख २ लाख २५ हजार रुपये
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे ७० हजार रूपये
आमदार समाधान आवताडे एकूण – २० हजार रुपये
आमदार राजेंद्र राऊत – ३ लाख ५३ हजार रूपये
आमदार बबनराव शिंदे व आमदार संजय शिंदे आणि कुटुंबिय – ७ लाख ८६ हजार रुपये
खासदार रणजितसिंह निंबाळकर – ३ लाख रुपये
आमदार संग्राम थोपटे – १ लाख रुपये
माजी खासदार प्रतापराव जाधव – १ लाख ५० हजार रुपये
आमदार सुहास कांदे ५० हजार रुपये
आमदार रवी राणा – ४० हजार रुपये
आमदार वैभव नाईक – २ लाख ८० हजार रुपये
माजी मंत्री विजयकुमार गावित ४२ हजार रुपये
माजी आमदार शिरीष चौधरी – ७० हजार रुपये
मंत्री संदीपान भुमरे – १ लाख ५० हजार रुपये
खासदार रजनीताई पाटील- ३ लाख रुपये
आमदार प्रकाश सोळंके – ८० हजार रुपये
आमदार संदीप क्षीरसागर – २ लाख ३० हजार रुपये
राज्यमंत्री संजय बनसोडे – ५० हजार रुपये
आमदार अशिष जयस्वाल – ३ लाख ३६ हजार रुपये
आमदार महेश शिंदे ७० हजार रुपये
माजी मंत्री सुरेश खाडे – १ लाख ३२ हजार रुपये
सदाभाऊ खोत – १ लाख ३२ हजार ४३५ रुपये