जळगाव – शहरातील अयोध्या नगर येथे आज एका ३५ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली असल्याची घटना आज सकाळी येथे घडली . याप्र्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी कि, यावल तालुक्यातील साखळी येथील रहिवाशी ह.मु. अयोध्या नगर येथे राहणारे संदीप चंद्रकांत राजपूत हे फर्टिलायझर कंपनीत कामाला आहेत . आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास दुकानावरून जेवणासाठी घरी आल्यानंतर कुणालाही काहीही न सांगता राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली . याघटनेमुळे संदीप यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात एकच आक्रोश केला. संदीपच्या पश्चात पत्नी ,दोन मुली, आई वडील असा परिवार आहे .