मुंबई । प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या खिशात कंडोम सापडल्याचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होतोय. नुसरत भरूच या अभिनेत्रीचा आगामी काळात सिनेमा येणार असून जनहित मे जारी असं या चित्रपटाचं नाव आहे. याच्याच प्रमोशनचा एक भाग म्हणून नुसरतं कंडोम खिशात ठेवलेला एक फोटो पोस्ट करून एखादीचा पाठलाग करायला लाज वाटून घ्या मात्र कंडोम वापरताना लाजू नका असं म्हणत जनहित मे जारी केलं आहे.
नुसरतंने Stolking करणे से शर्म करो, कंडोम इस्तेमाल करणे से नही असं लिहिलेलं टीशर्ट घातले असून हि अभिनेत्री सध्या चांगलीच चर्चेत आहे. कंडोम वापरायला लाज वाटून घेऊ नका असं ती का म्हणतेय बरं? अशीही चर्चा सुरूय. नुसरतच्या एकंदर लूकवरून ती यात काहीतरी भन्नाट वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे असं वाटतंय. Nushrratt Bharuccha
“ड्रीम गर्ल” च्या दिग्दर्शक-लेखकाने एका असामान्य पण विनोदी विषयावर चित्रपटात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. “जनहित में जारी” काही अतिशय मनोरंजक सामाजिक समस्यांवर प्रकाश टाकतो. “मला स्क्रिप्ट ऐकताच मी लगेचच या चित्रपटाचा भाग होण्याचा निर्णय घेतला” असं नुसरत तिच्या एका मुलाखतीत म्हणाली आहे. तिच्या भूमिकेबद्दल आणि चित्रपटाच्या विषयाबद्दल ती उत्सुक होती. “ड्रीम गर्ल” नंतर, राजसोबत पुन्हा एकदा चित्रपट करणे खरोखरच एक छान अनुभूती आहे. मी भानुशाली स्टुडिओ लिमिटेडसोबत सहयोग करण्यास अत्यंत उत्सुक आहे,” ती पुढे म्हणाली. Nushrratt Bharuccha
https://www.instagram.com/p/CdC0C2-tz9w/?utm_source=ig_web_copy_link
हा चित्रपट एका तरुण मुलीच्या जीवनाभोवती फिरतो जी सामाजिक प्रथांना ठार मारण्याचा प्रयत्न करते आणि मध्यप्रदेशातील एका छोट्या गावात कंडोम विकण्यासाठी बाहेर पडते. तिला जगाकडून आणि तिच्या स्वतःच्या कुटुंबाकडून कोणत्या प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागतो हे चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने बाकीची स्टोरी आपण राखून ठेउयात. पण सध्या नुसरतचा कंडोम खिशात घेतलेला फोटो मात्र चांगलाच व्हायरल होतोय हे नक्की
जानहित में जरी रिलीजची तारीख (Nushrratt Bharuccha) –
हा चित्रपट 2021 च्या अखेरीस कुठेतरी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल असे सांगितले जात होते परंतु अनेक कारणांमुळे विलंब झाला. आता 10 जून 2022 ला जण हित मे जारी चित्रपट रिलीज होऊ शकतो.