साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची पात्र उमेदवारांकडून अर्ज मागितले जात आहे. एकूण १०३३ पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज मागण्याची प्रक्रिया २५ एप्रिल २०२२ पासून सुरू झाली आहे.
एसईसीआर रेल्वे अप्रेंटिस भरती २०२२ मध्ये डीआरएम ऑफिस, रायपूर डिव्हिजनमध्ये एकूण ६९६ अप्रेंटिंस पदे आणि वेगन रिपेअर शॉप, रायपूरमद्ये एकूण ३३७ अप्रेंटिस पदांचा समावेश आहे. ट्रेड वाइज व्हेकन्सी डिटेल्स खाली दिलेल्या नोटिफिकेशनमध्ये तपासून घेऊ शकता. अप्रेंटिस पोस्टवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सरकारी नियमांनुसार कमाल वयोमर्यादेमध्ये सवलत दिली जाईल, अधिका माहितीसाठी नोटिफिकेशन पाहा.
रेल्वे अप्रेंटिस पदांवर भरतीसाठी उमेदवारांची कुठलीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही. तर केवळ मॅट्रिक (दहावी) परीक्षेमध्ये मिळवलेल्या गुणांच्या किंवा टक्केवारीच्या आधारावर तयार केलेल्या मेरिट लिस्टनुसार उमेदवाराची निवड केली जाईल.
इच्छुक आणि पात्र उमेदवारा अप्रेंटिसशिप इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर apprenticeshipindia.org जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्जाची हार्ड कॉपी स्वीकारली जाणार नाही. उमेदवारा केवळ ऑनलाईन मोडमध्येच अर्ज करू शकतील.