जळगाव प्रतिनिधी | प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस आणि मऊ दरम्यान विशेष शुल्कासह २० अतिजलद साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या सुरू हाेणार आहेत.
गाडी क्रमांक ०१०५१ अतिजलद साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून २८ एप्रिल ते ३० जूनदरम्यान (१० फेऱ्या) दर गुरुवारी ५.१५ वाजता सुटेल आणि मऊ येथे दुसऱ्या दिवशी १२.४५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१०५२ अतिजलद साप्ताहिक विशेष गाडी मऊ येथून ३० एप्रिल ते २ जुलैदरम्यान (१० फेऱ्या) दर शनिवारी ५.४५ वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १२ वाजता पोहोचेल.
असे आहेत गाडीचे थांबे
या गाड्या कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती स्टेशन, बिना, राणी लक्ष्मीबाई स्टेशन, ओराई, कानपूर, फतेहपूर असे थांबे असणार आहेत.