जळगाव : दहा दिवसांपासून राज्यावर घाेंगावत असलेल्या पावसाचे सावट अजूनही कायम आहे. ढगाळ स्थितीत तापमानाचा चटका अधिक तिव्रतेने जाणवत आहे. अशातच रविवारी राज्यातील सर्वाधिक ४६ अंश तापमानाची नोंद जळगाव जिल्ह्यात झाली आहे. उष्णतेची लाट असलेल्या विदर्भापेक्षाही जळगावातील तापमान रविवारी राज्यात सर्वाधिक हाेते.
यापूर्वी शनिवारी देखील जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. काही दिवसापूर्वी ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील उन्हाचा पारा २ ते ३ अंशांची घसरून ४० अंशावर आला होता. मात्र त्यानंतर पुन्हा तापमान वाढू लागले.
काल रविवारीचे जिल्ह्यातील तालुकानिहाय तापमान
जळगाव शहरातील तापमान ४६ अंशावर होते. तर भुसावळ ४६, अमळनेर ४६, भडगाव, ४५, चाळीसगाव ४१, एरंडोल ४५, बोदवड ४४, चोपडा ४६, धरणगाव ४६, फैजपूर ४६, जामनेर ४६, पारोळा ४५, रावेर ४६, वरणगाव ४६, मुक्ताईनगर ४६, पाचोरा ४६, सावदा ४५ आणि यावल ४६ अंश तापमानाची नोंद करण्यात आलीय.