जळगाव | केंद्रीय वाहतूक व रस्ते मंत्री नितीन गडकरी यांचे जळगावमध्ये दाखल झाले आहे. त्यांच्या उपस्थितीत जळगाव जिल्ह्यातील १९९ किलोमीटर लांबीच्या २१५३ काेटी रुपये खर्च झालेल्या राष्ट्रीय महामार्गांचे लाेकार्पण करण्यात येणार आहे. आज सायंकाळी ५.४५ वाजता शहरातील जी.एस. मैदानावर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा लोकार्पण साेहळा होणार आहे.
याआधी नितीन गडकरी यांच्याहस्ते आज धुळ्यातील राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण कार्यक्रम पार पडला. त्यानंतर ते धुळे येथून जळगावमध्ये दाखल झाले आहे. आज सायंकाळी चारच्या सुमारास ना. नितीन गडकरी हे धुळे येथून जळगावला विमानाने आले असून ते पहिल्यांदा हॉटेल प्रेसिडेंट कॉटेजमध्ये दाखल झाले आहेत.