रिंकू राजगुरु म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी आर्ची नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिच्या अदानी चाहते नेहमीच घायाळ होतात. रिंकू सोशल मीडियावर अनेकच फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
नुकताच रिंकूने सोशल मीडियावर चाहत्यांना घायाळ करणारे काही फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये रिंकूचा लूक जबरदस्त दिसतो आहे.
रिंकूने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाची साडी घातलेली दिसत आहे. त्यावर तिने केस मोकळे सोडले आहेत. साडीमध्ये रिंकूचा मनमोहक लूक दिसतो आहे.
रिंकूने हे फोटो तिच्या इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत. रिंकू कायमच हटके फोटोशूट करत असते. सध्या ती साडीवरती जास्त फोटोशूट करताना दिसते आहे.
रिंकूचे चाहते नेहमीच तिच्या फोटोची आतुरतेने वाट पाहात असतात. इन्स्टाग्रामवर रिंकूला फाॅलो करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे.