मुंबई : मुंबईतील कुर्ला विधानसभेचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. रजनी कुडाळकर असं त्यांचं नाव आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप समोर येऊ शकलेलं नाही. या घटनेने मात्र मोठी खळबळ उडाली आहे.
मंगेश कुडाळकर मुंबईतील कुर्ला विधानसभेचे प्रतिनिधित्व करतात. कुर्ल्याच्या नेहरु नगर परिसरात कुडाळकर कुटुंब वास्तव्यास आहे. येथीलच राहत्या घरी रजनी यांनी गळफास घेऊन जीवन संपवलं. पोलीस कुडाळकर यांच्या घरी गेले तेव्हा त्यांना रजनी यांचा गळफास घेतलेला मृतदेह आढळला.
दरम्यान, कुर्ला पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. रजनी कुडाळकर यांचे शव पोस्टमार्टम रिपोर्ट करता पाठवण्यात आले आहे. लवकरच याबाबत पुढील अपडेट येईल. ही बातमी ब्रेकिंग असल्याने स्क्रोल करा.