मुंबई,(प्रतिनिधी)- दादर जवळ गदग एक्सप्रेस आणि पॉंडीचेरी एक्सप्रेस या दोन रेल्वे आमने – सामने धडकल्याने दि.15 एप्रिल रोजी रात्री 9:45 वाजेदरम्यान मोठा अपघात होऊन ओव्हरहेड वायर्समध्ये शॉर्टसर्कीट झाल्याने काही आवाज देखील झाल्याचं समजते, मात्र अदयाप या अपघातात कुठलीही जीवितहानी झाल्याचे समोर आलेले नाही.
दादर नजीक असलेल्या माटुंगा रेल्वे रुळावर दोन रेल्वे आमने सामने आल्यानंतर काही वेळासाठी रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली होती. यामुळे मध्य रेल्वेची वाहतुक यामुळे खोळंबली होती. या घटनेत रेल्वेचे तीन डबे रुळावरुन घसरल्याची देखील माहिती समोर आली आहे. अपघात झाला त्यावेळी शॉर्टसर्कीट देखील झाल्याचे समजते.
या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, अग्निशामक दल, पोलीस यांच्यासह सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या त्यानंतर लगेचच बचाव कार्य सुरु करत वाहतूक सुरळीत करण्याचं काम करण्यात आलं.
दोन रेल्वेची क्रॉसींग होत असताना हा अपघात घडला आहे. यावेळी ओव्हरहेड वायर्समध्ये शॉर्टसर्कीट झाल्याने काही आवाज देखील झाल्याचं प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.दोन एक्सप्रेस आमने सामने आल्याने प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं. गदग एक्सप्रेस आणि पॉंडीचेरी एक्सप्रेस एमेकांवर आदळता आदळता थोडक्यात बचावल्या आहेत. त्यामुळे हजारो प्रवाशांचा जीव वाचला. ११००५ या रेल्वेची गदग एक्सप्रेसला धडक दिल्याने काही डबे रुळावरुन घसरल्याची माहिती रेल्वेचे माहिती व संपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली आहे.