मुंबई : झारखंडमधील देवघरच्या रोपवेवर झालेल्या दुर्घटनेचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमीही झाले आहेत. या अपघाताशी संबंधित एक व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Footage of Deoghar Ropeway Accident
10-04-2022 4:30pm#Jharkhand#Deoghar#DeogharRopewayAccident #DeogharAccident#PMModi#IAF pic.twitter.com/GvdoIfIh4Q— Purushottam Keshri (@k_puru30) April 12, 2022
अपघातापूर्वीचा काही सेकंदांचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये या घटनेचा भितीदायक क्षण कैद करण्यात आला आहे. वास्तविक, 1 मिनिट 18 सेकंदाचा हा व्हिडिओ केबल कारमध्ये उपस्थित असलेल्या एका पर्यटकाने बनवला आहे, व्हीडिओमध्ये ट्रॉली ये-जा करताना दिसत आहेत. ज्यामध्ये तो प्रवास करताना पर्वतांचे दृश्य टिपत होता. मात्र याचदरम्यान केबल कारची वायर तुटल्याने आणि फोन पडल्याने अपघात झाला. मात्र, यावेळी व्हिडिओमध्ये किंचाळण्याचे आवाज ऐकू येत आहेत.