चाळीसगाव – शहरातील जीके आबा मळा कादरी नगर भागात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी एक लाखांची रोकड लंपास केल्याची घटना आज सकाळी उघड झाली . याबाबत माहिती अशी कि, जहिरोद्दीन सिराजुद्दीन शेख हे रमजान ईद साजरी करण्यासाठी कुटुंबियांसह वडिलांकडे गेले होते . त्यामुळे त्यांच्या बंद घराच्या कंपाऊँ आणि दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत कपातील ठेवलेली एक लाखाची रोकड चोरली . आज सकाळी जहिरोद्दीन शेख हे घरी परतले असता त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले . याबाबत अज्ञात चोरट्यांविरुद्ध चाळीसगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस करीत आहे.