जळगाव, दि. 13 (प्रतिनिधी) – शहरातील सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव समितीद्वारे महावीर जयंतीच्या औचित्याने विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
महावीर जयंतीचे विविध कार्यक्रम
महावीर जयंतीच्या औचित्याने सकाळी 7.00 वाजता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये स्वाध्याय मंडळ आणि सुशील महिला मंडळ यांच्यातर्फे ‘फळ वाटप’, सकाळी 7.15 वाजता ध्वज वंदना तर सकाळी 7.45 ला वासुपूज्य जैन मंदिर येथून भव्य शोभायात्रा व वरघोडा निघेल. सकाळी 9.00 वाजता जय आनंद ग्रुपतर्फे बालगंधर्व नाट्यगृह व मॉडर्न गर्ल स्कूल येथे रक्तदान शिबिर होणार आहे. सकाळी 9:30 ला महावीर जयंती मुख्य समारोहात बालगंधर्व खुले नाट्यगृह येथे भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्र लुंकड यांचे मार्गदर्शन होईल. सकाळी 11.00 वाजता जीवदया संस्कार सामग्री वाटप मॉडर्न स्कूल येथे होईल.
या कार्यक्रमांना उपस्थिती द्यावी असे आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष श्री. स्वरूप लुंकड़ व जन्मकल्याणक समितीने केले आहे. हा भव्य जन्मजयंती महोत्सव सेवादास दलूभाऊ जैन, माजी खा. ईश्वरबाबूजी जैन, जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन, प्रदीप रायसोनी, अजय ललवानी यांच्या मार्गदर्शनात संपन्न होत आहे.
१५ एप्रिल २०२२चे कार्यक्रम-
प.पू. १००८ आचार्य रामलालजी म.सा. जयंतीच्या औचित्याने सकाळी 7.00 ते 8.00 दरम्यान सिव्हील हॉस्पिटलमध्ये समता युवा संघा तर्फे फळ वाटप, स्वाध्याय भवन येथे 9 वाजता साधुमार्गी जैन संघातर्फे गुणानुवाद सभा तर सकाळी 10.00 ते 10.30 दरम्यान नवकार महामंत्र जाप होईल.