महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदिवरील भोंग्या बाबत घेतलीली भूमिका ते बदलणार नसल्याचं त्यांनी सांगितलं असून येत्या ३ मे पर्यंत ”मशिदिवरील भोंगे” काढण्या करिता राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. मनसेनेचे राज ठाकरे यांनी पाडाव्याच्या सभेत मशिदिवरील भोंगे उठविण्यासाठी भूमिका घेतली होती,त्या भूमिकेचे पडसाद राज्यभर पाहायला मिळाले होते.
दरम्यान राज ठाकरे यांनी आज ठाण्यातील उत्तर सभेत बोलतांना सरकारला अल्टिमेटम देत ३ तारखेपर्यंत भोंगे उतरवा, हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे असे सांगत आमची भूमिका मागे घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
प्रार्थना तुमची आहे आम्हाला कशाला ऐकवताय….
राज ठाकरे म्हणाले की, मशिदिवरचे भोंगे उतरवा हे मी आधिच सांगितंल होतं. पण ऐकू नाही आलं. याचा देशाला त्रास होतो आहे. यात धार्मिक विषय कुठं आहे, प्रार्थना तुमची आहे आम्हाला कशाला ऐकवताय. तुम्हाला सांगून जर कळत नसेल की आम्हाला त्रास देऊ नका, तर तुमच्या मशिदी बाहेर हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार.
आमची भूमिका मागे घेणार नाही, मशिदींवरील सर्व भोंगे ३ मे पर्यंत काढा…
राज ठाकरे यांनी आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही, असे सांगत त्यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. जर मशिदींवरचे भोंगे उतरवले नाही तर, तुमच्या मशिदीबाहेर हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार असे देखील राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, ३ तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे की, कुठलीही तेढ, दंगल निर्माण करायची नाहीये. आम्हाला त्याची इच्छादेखील नाही. त्यामुळे १२ एप्रिल ते ३ मे, महाराष्ट्रातल्या सगळ्या मशिदींमधल्या मौलवींशी राज्य सरकारने चर्चा करावी आणि त्यांना सगळे भोंगे खाली उतरवण्यास सांगावे.
Loudspeakers in mosques should be shut till May 3rd otherwise, we will play Hanuman Chalisa in speakers. This is a social issue, not a religious one. I want to tell the state government, we will not go back on this subject, do whatever you want to do: MNS chief Raj Thackeray pic.twitter.com/H4ysJvCJym
— ANI (@ANI) April 12, 2022
उत्तर सभेत राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधलाय. शरद पवार कधीही छ. शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत. कारण, शिवरायाचं नाव घेतलं तर मुस्लिम मतं जातील याची त्यांनी भीती वाटते म्हणून, ते कोणत्याही सभेत छ. शिवाजी महाराजांचं नाव घेणं टाळतात, असा आरोप राज ठाकरेंनी केलाय.
ते पुढं म्हणाले, शरद पवार स्वत: नास्तिक आहेत. त्यामुळं ते धर्माकडं नास्तिकतेनं पाहतात. ते धर्म-बिर्म, देव-बिव काही मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीनं राजकारण समजावण्याचा प्रयत्न करतात. देशात, महाराष्ट्रात असंख्य जाती आहेत. प्रत्येक जातीला आपापल्या जातीबद्दल अभिमान होता. 1999 ला राष्ट्रवादीचा जन्म झाला आणि त्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष सुरू झाला, असा घणाघातही त्यांनी राष्ट्रवादीवर केला.