डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईच नावं काय होतं असा प्रश्न तुमच्या मनात असेल तर जाणून घ्या की बाबासाहेबांच्या आईचं नावं ‘भीमाबाई’ होतं भीमाबाई रामजी सकपाळ किंवा भीमाबाई आंबेडकर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई व सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या पत्नी होत्या. त्यांचे वडील लक्ष्मण मुरबाडकर हे आधी मराठा पलटणीत व नंतर १०६ सॅपर्स ॲंन्ड मायनर्समध्ये सुभेदार होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईसाहेब भीमाबाई…
भीमाबाईचा विवाह….
इ.स. १८६७ मध्ये वयाच्या १३व्या वर्षी भीमाबाईंचा विवाह १९ वर्षीय रामजी सकपाळ यांच्याशी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे विवाह झाला.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे माहेर हे मुरबाड असून ते ठाणे जिल्ह्यात येतं.इ.स. १८६६ च्या सुमारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स ॲंड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले तर भीमाबाईंचे वडील मुरबाडचे राहणारे होते व ते इंग्रजी सैन्यात सुभेदार या पदावर होते.
रामजी व भीमाबाई या दांपत्यांना १८९१ पर्यंत चौदा अपत्य झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा, व तुळसा या चार मुली जीवंत राहिल्या होत्या. मुलांपैकी बाळाराम, आमंदराव, व भीमराव ही तीन मुले जिवंत होती. भीमराव सर्वात लहान व चौदावे अपत्य होतं .रामजी ज्या पलटणीत होते ती पलटन इ.स. १८८८ मध्ये मध्य प्रदेशातील येथे लष्करी तळावर आली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म…..
रामजी व भीमाबाईंच्या पोटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी महू या लष्करी छावणी असलेल्या गावी झाला. भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४वे व अंतिम अपत्य होते.बाळाचे नाव ‘भिवा’ असे ठेवण्यात आले, तसेच त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली.बाबासाहेबांना बालपणी भिवा या नावानं हाक दिली जाई.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच मूळ गाव महाराष्ट्रातील
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा परिवार मूळ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावचे होते. इ.स. १८९४ मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळीत दापोली या गावातील ‘कॅम्प दापोली’ वस्तीत परिवारासह राहू लागले.
बाबासाहेब ५ वर्षाचे असतांना आईचा मृत्यू
इ.स. १८९६ मध्ये रामजींची आपल्या कुटुंबासह दापोली सोडली व सातारा येथे राहिले या वर्षीच त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली. इ. स.१८९६ मधे मस्तकशूळ या आजाराने भीमाबाईंचे निधन झाले, त्यावेळी भीमराव आंबेडकर ५ वर्षाचे होते.