आयएनएस विक्रांत (INS Vikrant) वाचवण्यासाठी गोळा केलेला निधी अपहार प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर गोळा केलेला निधी नेमका किरीट सोमयांनी कुठं खर्च केला या बाबत अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी सुरू असताना सोमय्यांच्या वकिलांनी कोर्टात त्या बाबत माहिती दिली आहे.
किरीट सोमय्या यांच्या वकिलांनी मे. न्यायालयात माहिती देतांना सांगितलं की,आयएनएस विक्रांत (INS Vikrant) वाचवण्यासाठी गोळा केलेला निधी आम्ही राजभवनात द्यायला गेलो होतो. मात्र तिथं कोणतही खातं नसल्यामुळे आम्ही ते पैसे पक्षाला दिले, असा दावा किरीट सोमय्यांच्या वकिलांनी आज कोर्टासमोर केला.
भाजप नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी सुरू असताना, सोमय्यांच्या वकिलांनी कोर्टात ही माहिती दिली आहे. तसंच हे प्रकरण खूप जुनं असल्याचं सांगत विक्रांतसाठी फक्त आम्हीच नव्हे, तर शिवसेनेने देखील निधी गोळा केला होता, अशी माहिती सोमय्यांची बाजू मांडणारे वकिलांनी न्यायालयात दिली.
गोळा केलेला निधी पक्षाला दिला…
ज्या कथित अपहरा बाबत गुन्हा दाखल केला आहे ती घटना 2013 सालची असून विक्रांत युद्धनौका वाचवण्याची मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत राज्य सरकार आणि मुंबई महापालिका सहभागी होती. तक्रारदारांनी दिलेली तक्रार ही प्रसार माध्यमातून मिळालेल्या माहितीवर विक्रांतसाठी शिवसेनेही पैसे जमा केले होते आम्ही पैसे द्यायला गेलो होतो, मात्र खातं नसल्यामुळे आम्ही ते पैसे पार्टीला दिले असल्याचा युक्तीवादही वकीलांनी कोर्टासमोर केला.
दरम्यान, आयएनएस विक्रांत या विमानवाहू जहाजाला वाचवण्यासाठी गोळा केलेल्या निधीच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी विशेष न्यायालयाने सोमय्या पिता-पुत्रांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर सुनावणी पूर्ण केली असून आदेश राखून ठेवला असून कोर्ट सोमय्या पिता-पुत्रांसंदर्भात आजच आपला आदेश देणार आहे.