जळगाव : भुसावळ रेल्वे स्थानकावरून निघालेल्या अहमदाबाद- बरोणी एक्सप्रेस (Ahmedabad Baroni Express) भुसावळ- जळगाव या दरम्यान रेल्वे रुळावर s-7 या एसी बोगीचे सेंटर ओपन असल्याने एस ७ या बोगीतून धूर निघताना दिसून आले. जळगाव स्थानकावर गाडी थांबवून आग बंद केली.दरम्यान एक्सप्रेसच्या गार्ड व चालकाने प्रसंगावधान राखून तात्काळ गाडी जळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर उभी केली. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
अहमदाबाद- बरोणी एक्सप्रेस भुसावळहून मार्गस्थ झाल्यावर जळगाव काही अंतरावर राहिले असताना रेल्वेच्या एसी बोगीतून धूर निघत असल्याचे लक्षात आले. यानंतर एक्सप्रेसच्या गार्ड व चालकाने प्रसंगावधान राखून तात्काळ गाडी जळगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर उभी केली.यावेळी टेक्निशियन सेंचर ओपन करून वाढणारी आग बंद केले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे जळगाव रेल्वे स्थानकावर एकच खळबळ उडाली होती. काही वेळात आग आटोक्यात आल्याने काही वेळात धुर निघणे बंद झाल्याने जळगावकडून अहमदाबादकडे रेल्वे मार्गस्थ करण्यात आली.
महापालिकेचे तीन अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र अग्निशमन बंब पोहचण्याआधीच आग बंद करण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकाचे महापौर सौ. जयश्री सुनील महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील हे जळगाव रेल्वेस्थाणकावर पोहचले.