जळगाव,(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील प्रमुख मागण्यांसाठी भाजचे नेते माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात दि.12 एप्रिल रोजी ‘भव्य आक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले असुन यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसह इतर प्रमुख मागण्यांसाठी भाजपच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येत आहे.
भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवार दिनांक १२ एप्रिल २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जळगाव येथे भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असुन, आज दिनांक 10 एप्रिल रोजी जि.एम फाउंडेश येथे झालेल्या बैठकीत आमदार गिरीष महाजन यांनी शेतकऱ्यांच्या संयमाची शासनाने अंत पाहु नाका शेतकऱ्यांच्या संयम आता संपला असुन यांच्या उद्रेकाची वेळ आली आहे असे सांगितले लोकप्रतिनिधीनी या कठीण काळात शेतकऱ्यां करता रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले.
मोर्चाचे नेतृत्व मा मंत्री आ गिरीश महाजन हे करणार असुन . मोर्चास सुरुवात दुपारी 2 वाजता जि. एस. ग्राऊंड येथुन सुरू होईल. सदर मोर्चा जिल्हाध्यक्ष आ सुरेश दामु भोळे (राजुमामा) यांच्या नियोजनात भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.या मोर्चाला जिल्ह्यातील शेतकरी, भाजपाचे नेते, भाजपचे जि.प.सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, बाजार समिती सदस्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन, , जिल्हाध्यक्ष आ सुरेश दामु भोळे (राजुमामा)खा उन्मेश पाटील, खा रक्षा ताई खडसे, महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी,आ संजय सावकारे, आ मंगेश चव्हाण, आ चंदू भाई पटेल, मा आ स्मिता वाघ,
प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा पोपट तात्या भोळे ,
जिल्हाउपाध्यक्ष नंदुभाऊ महाजन, प्रल्हाद पाटील ,पी सी आबा पाटील ,महेश बापू पाटील, के बी सांळुखे , जिल्हासरचिटणिस मधु जी काटे, जिल्हा संघटन सरचिटणिस सचिन पानपाटील ,विशाल त्रिपाठी, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण बापू चौधरी ,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, रविद्र पाटील ,भरत महाजन, दीपक साकरे, सुनील काळे, आरिफ शेख, आदींनी केले आहे असे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख मनोज भांडारकर यांनी कळविले आहे
आपला नम्र मनोज भांडारकर जिल्हा प्रसिध्दी प्रमुख जळगाव महानगर