जळगाव – दिनांक 11 एप्रिल 2022 रोजी सकाळी 8 वाजता फुले मार्केट येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती तर्फे मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे . डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे प्रमुख मार्गदर्शक मुकुंदभाऊ सपकाळे व ऍड. राजेशजी झालटे यांच्या हस्ते निळा झेंडा दाखवुन सदर रॅलीचा शुभारंभ करण्यात येणार आहे .
सदर कार्यक्रमास हमाल मापडी कामगार संघटनेचे अध्यक्ष धुडकूभाऊ सपकाळे , अनिलभाऊ अडकमोल , अमोल कोल्हे , नगरसेवक सुरेशभाऊ सोनवणे , माजी नगरसेवक राजूभाऊ मोरे , दिलीपभाऊ सपकाळे , वाल्मिक सपकाळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे . तरी शहरातील सर्व आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष गणेश पगारे , उपाध्यक्ष सोनू आढाळे , सचिव पंकज सोनवणे , अजय गरुड , संजय सपकाळे , विक्की सोनवणे , भारत सोनवणे , मिलिंद सोनवणे , नितीन अहिरे , आनंदा तायडे , प्रकाश वाघ , संदीप वाघ , प्रताप बनसोडे , रोहन अवचारे यांनी केलेले आहे .