मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सदावर्ते यांना दोन दिवस म्हणजेच ११ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत काढावे लागणार आहेत.
शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार आंदोलन केलं. यावेळी पवार यांच्या निवासस्थानी चपला फेकण्यात आल्या, तसंच दगडफेकही करण्यात आली. या आंदोलनामागे अॅड. गुणरत्न सदावर्ते असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येतोय. अशावेळी शुक्रवारी रात्री मुंबई पोलिसांनी सदावर्ते यांना ताब्यात घेतलं.
हे पण वाचा :
जळगावात पुन्हा खून, प्रौढाची दगडाने ठेचून हत्या
धक्कादायक ! ३ वर्षाच्या लेकीसह आईची धावत्या रेल्वेतून उडी घेऊन आत्महत्या
Video ! उर्फी जावेदने घातला असा ड्रेस कि करावा लागला अश्लील कमेंट्सचा सामना
गुणरत्न सदावर्तेंवर दाखल गुन्ह्याच्या एफआयआरमधून धक्कादायक खुलासा
त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आणि आज किला कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टात सुनावणी पार पडल्यानंतर सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. तर अन्य आरोपींची न्यायलयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.