जळगाव, दि.०९ – मोदी सरकारने गोरगरीब, वंचितांसाठी सुरु केलेल्या आयुष्मान भारत योजनेतून आजवर देशभरात ३.२८ कोटींपेक्षा अधिक लोकांवर उपचार करण्यात आले आहेत. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी १८ कोटींपेक्षा अधिक लोकांना आयुष्मान कार्ड चे वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजुमामा) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्वस्त दरात औषधे पुरविण्याच्या उद्देशाने देशभरात ८ हजार ६९४ पंतप्रधान जनऔषधी केंद्रे सुरुकरण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. भारतीय जनता पार्टीच्या ४२ व्या स्थापनादिनानिमित्त मोदी सरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, गोरगरीब, वंचित वर्गातील जनतेला अनेक आजारांवरील महागडे उपचार परवडत नाहीत हे ओळखून मोदी सरकारने सप्टेम्बर २०१८ मध्ये आयुष्मान भारत योजनेचा प्रारंभ केला. या योजनेत खासगी आणिसरकारी रुग्णालयांत ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जातात. या योजनेत सरकारी आणि खासगी मिळून २७ हजार ३०० रुग्णालये सहभागी झालीआहेत. आयुष्मानभारत डिजिटल मिशनसाठी मोदी सरकारने सोळाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यायोजनेत देशभरातील १०.७४ कोटींपेक्षा अधिक गोरगरीब, वंचितकुटुंबांना म्हणजे ५० कोटी लोकांना मोफत उपचाराची सुविधा देणे हा या योजनेचा हेतू आहे. या योजनेची माहिती मिळवण्यासाठी mera.pmjay.gov.in नावाचेसंकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे.
तसेच 14555 आणि 1800-111-565 टोल फ्रीक्रमांकांवरही या योजनेची माहिती मिळू शकेल. या योजनेचा लाभ घेतलेल्यांमध्ये सुमारे ४७ टक्के महिला आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.ते म्हणाले की, देशातील आरोग्य सेवा आणिसुविधा परिपूर्ण बनविण्यासाठी मोदी सरकारने ‘आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन’सुरु केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून ६५ हजार कोटी रुपये खर्चून देशभरातीलआरोग्य केंद्रात अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जिल्हापातळीवरील सरकारी रुग्णालयात आयसीयु, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन या सुविधांसह ३७ हजारबेड उपलब्ध केले जाणार आहेत.
या बरोबरच ब्लॉक पातळीवर ४ हजार पेक्षा अधिकसार्वजनिक आरोग्य केंद्रे तसेच प्रयोगशाळा सुरु केल्या जाणार आहेत. मोदी सरकारने सिरींज, डिजिटल थर्मामीटर, स्टेंट, डायलिसिस मशीन या सारख्या उपकरणांना औषधांच्या श्रेणीत आणल्यामुळे या उपकरणांच्या किंमती नियंत्रणात आल्या आहेत. मोदी सरकारने कॅन्सर, टीबी, मधुमेह यासारख्यादुर्धर आजारावरील ८०० औषधे कमी किमतीत उपलब्ध करून दिली आहेत. स्वस्त दरात औषधेउपलब्ध करून देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांची संख्या ९ मार्च २०२२ पर्यंत ८ हजार ६९४ पर्यंत पोहचली आहे, असेही त्यांनी सांगितले.