जळगाव । मंदिराच्या पटांगणात खेळताना शॉक लागल्याने ५ वर्षीय चिमुकला गतप्राण झाल्याची घटना आज गुरुवारी सायंकाळी जळगाव शहरातील गवळीवाड्यात घडली. तुषार उर्फ आरू शिवाजी सुरवाडकर (वय-५ रा. गवळीवाडा, तांबापूरा) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून याबाबतचे शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
याबाबत असे की, जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात असलेल्या गवळीवाडा येथील हनुमान मंदीराच्या पटांगणात तुषार सुरवाडकर हा चिमुकला व त्याचा मोठा भाऊ महेश आणि गल्लीतील काही मुले गुरूवार दि.७ एप्रिल रोजी सायंकाळी खेळत होते. त्यावेळी मंदीराच्या संरक्षण भिंतीच्या लोखंडी जाळीला तुषारचा स्पर्श झाल्याने त्याचा विजेचा जोराचा धक्का बसला आणि तुषारचा जागीच मृत्यू झाला.
दुर्घटनेत तुषारचा जागीच मृत्यू झाला असून दैव बलवत्तर असल्याने इतर खेळत असलेले लहान मुले बचावले आहे. या घटनेची माहिती मिळताचा नातेवाईकांना घटनास्थळी धाव घेवून हंबरडा फोडला होता. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.