पुणे : राज्यात मशिदीवरील भोंग्यावरुन वाद सुरु असताना गृहमंत्र्यांचा एका व्हिडिओ समोर आला आहे. शिरुरमध्ये एका कार्यक्रमात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे भाषणासाठी उभे असताना अचानक अजानचा आवाज आला आणि गृहमंत्री वळसे पाटील यांनी भाषण थांबवले आणि अजान संपल्यानंतर पुन्हा भाषणाला सुरुवात केली.
#WATCH Maharashtra Home Minister Dilip Walse Patil halts his speech midway for Azaan, at an event in Shirur, earlier today pic.twitter.com/IpV35YuIAr
— ANI (@ANI) April 4, 2022
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील सोमवारी पुण्यातील शिरुरमध्ये होते. यावेळी गृहमंत्री एका जाहीर सभेमध्ये भाषण देत होते. त्याचदरम्यान अचानक शेजारच्या मशिदीतून अजान सुरु झाले. अजान सुरु होताच गृहमंत्र्यांनी आपले भाषण थांबवले आणि ते तसेच उभे राहिले. अजान संपल्यावर त्यांनी पुन्हा एकदा आपल्या भाषणाला सुरुवात केली. सध्या रमजानचा महीना सुरु आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांचा शिरुरमधला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
महाविकास आघाडीची समतोल भूमिका आणि राज ठाकरेंची कडवी?
गुढीपाडव्यानिमित्त दादरमधील शिवाजी पार्क येथे आयोजित मनसे मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजानसाठी मशिदींवरील भोंग्यांवर आक्षेप घेतला. मशिदीतील भोंगे काढले नाही तर त्या मशिदींबाहेर दुप्पट आवाजाने स्पिकर लावू आणि त्यात हनुमानचालीसा वाजवू’, असा थेट इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी दिला होता. तर दुसरीकडे महाविकास आघाडी राज्यातील सामाजिक परिस्थितीत समतोल साधण्याचा प्रर्यंत करताना दिसून येत आहेत. वरील दोन उदाहरणावरून याची प्रचती बघायला मिळाली आहे.