वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या निधीतही ‘या’ महाविकास आघाडी सरकारनं ‘डल्ला’ मारला असल्याचा गंभीर व खळबळजनक आरोप राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोली येथे केला आहे. वेगवेगळ्या विषयाचे मुद्दे घेऊन फडणवीस महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा सपाटा सुरूच असून आज थेट वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या निधीत डल्ला मारल्याचा आरोप झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
देवेंद्र फडणवीस हे पुढे बोलतांना म्हणाले की,महाविकास आघाडीचे सरकार इतके नालायक आहे की, वेश्यांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीतसुद्धा भ्रष्टाचार केला. वेश्यांसाठी दिले जाणारे पैसे आपल्या नातेवाइकांना दिले. वैश्यांच्या पैशांवर या सरकारने डल्ला मारला. असे करणाऱ्यांना काय म्हणतात, ते मी सांगणार नाही. तो शब्द शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना माहिती आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हाणल
राज्य सरकारची नियत काय आहे बघा. कोरोना काळात दुर्दैवाने ज्या भगिनींना वेश्याव्यवसाय करावा लागतो त्यांना मदत करा, असे केंद्र सरकारने सांगितले होते. त्यांना मदत करण्याची घोषणाही केली होती. आम्हाला वाटले एका घटकाला तरी हे सरकार मदत करीत आहेत. परंतु, हे सरकार नालायक निघाले. वेश्यांसाठी दिले जाणारे पैसे नातेवाइकांना देऊन वैश्यांच्या पैशांवर या सरकारने डल्ला मारला, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.