
भुसावळ (प्रतिनिधी ) – भुसावळ विधानसभा राखीव मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडी उमेदवारी करीत असलेले उमेदवार कामगार नेते जगनभाई सोनवणे यांनी आज आपल्या मतदार संघात मतदारांशी संवाद साधत मतदारांना भुसावळ मतदार संघाच्या विकासासाठी आघाडीला मतदान करा असे आवाहन केले.
मतदार बंधू- भगिनींनो तुम्ही साथ द्या… मी पुढील पाच वर्षात मतदार संघातील एकही समस्या ठेवणार नाही, मतदार संघातील बेरोजगारी संपुष्टात आणून नवीन उद्योग उभारणीसाठी मी वचनबद्ध असल्याचे जगनभाई सोनवणे यांनी मतदारांशी बोलतांना सांगितले. यावेळी मतदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.