नवी दिल्ली : देशभरात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होऊ लागली आहे. सरकारी इंधन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याची 13 दिवसांत ही अकरावी वेळ आहे. आज रविवारी सकाळी इंधनाच्या दरात 80 पैसे/लिटरने वाढ झाली असून, त्यानंतर राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा दर 103.41 रुपये झाला आहे, तर डिझेलचा दर 94.67 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 118.41 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. तसेच आता डिझेल देखील 102.64 रुपये प्रति लिटरच्या पुढे विकले जात आहे.
22 मार्चपासून आतापर्यंत पेट्रोलच्या किमतीत 1 रुपयांनी वाढ झाली आहे. मुंबईबद्दल बोलायचे झाले तर, पेट्रोलचा दर 84 पैशांनी वाढून 118.41 रुपये/लिटर झाला आहे, तर डिझेलचा दर 85 पैशांनी वाढून 102.64 रुपये/लिटर झाला आहे.
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर किती आहेत याची माहिती तुम्ही एसएमएसद्वारेही मिळवू शकता. यासाठी इंडियन ऑइल (इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड – IOCL) च्या ग्राहकांना RSP कोड ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुम्हाला इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर कोड सापडेल.
सीएनजीच्या दरातही वाढ
उल्लेखनीय आहे की, शुक्रवारी संध्याकाळीच IGL ने घरगुती गॅल म्हणजेच PNG च्या किमतीत वाढ केल्याचे जाहीर केले आहे. आयजीएलने सांगितले की पाईपद्वारे स्वयंपाकघरात पोहोचणाऱ्या पीएनजीची किंमत प्रति एससीएम 5.85 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. या वाढलेल्या किमती १ एप्रिल २०२२ पासून लागू झाल्या आहेत. या वाढीनंतर आता दिल्ली NCR मध्ये PNG च्या किमती ४१.७१/SCM वर गेल्या आहेत.