इंडिया पोस्टमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्ण संधी आहे. यासाठी इंडिया पोस्टने मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, टायरमन, लोहार पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ मे आहे.
याशिवाय, उमेदवार https://www.indiapost.gov.in/vas/Pages/India या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. तसेच, https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Recruitment/IP या लिंकद्वारे तुम्ही अधिकृत अधिसूचना (इंडिया पोस्ट रिक्रूटमेंट 2022) देखील पाहू शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 9 पदे भरली जातील.
महत्वाची तारीख
ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 मे 2022 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत
रिक्त जागा तपशील
कुशल कारागीर – ९
मेकॅनिक – 5
इलेक्ट्रिशियन – २
टायरमन – १
लोहार – १
पात्रता निकष
संबंधित ट्रेडमधील प्रमाणपत्रासह किंवा संबंधित ट्रेडमधील एक वर्षाच्या अनुभवासह सरकारद्वारे मान्यताप्राप्त कोणत्याही तांत्रिक संस्थेतून इयत्ता 8 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावी.
निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल.
अर्ज कसा करावा
पात्र आणि इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात ऑफलाइन अर्ज करू शकतात आणि अर्ज “Sr. Manager (JAG), Mail Motor Service, 134-A, Sudam Kalu Ahire Marg, Worli, Mumbai- 400018” वर पाठवू शकतात.
हे पण वाचा :
राज्यात पुन्हा अवकाळीचे संकेत, ‘या’ भागात पावसाची शक्यता
जळगावात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये धुसफूस? काँग्रेस आमदारासमोरच काँग्रेसचा माजी नगरसेवक राष्ट्रवादीत
भुसावळात तीन कंटेनरमधून तब्बल सव्वा दोन कोटीचा गुटखा जप्त
महाराष्ट्र सरकारमध्ये ‘या’ पदांवर सरकारी नोकरीची संधी..243 पदे रिक्त