जळगाव : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर सोन्याला मागणी वाढल्याने काहीप्रमाणात सोन्याच्या भाव वधारल्याचे दिसून येत आहे.
गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. याच दिवशी हिंदू नवीन वर्षाला प्रारंभ होतो. तसेच गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी सोने (gold) खरेदी करणे शुभ मानले जाते. याच पार्श्वभूमीवर जळगावमध्ये मोठी उलाढाल पहायला मिळत आहे, गेले दोन वर्ष कोरोनामुळे ग्राहकांचा गुढीपाडव्याचा मुहूर्त टळला होता व त्यामुळे सुवर्ण नगरीतील व्यवहार ठप्प होते. मात्र यावर्षी कोरोना निर्बंध हटवण्यात आल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.
सोन्याच्या दरात वाढ
आज राज्याची सुवर्णनगरी असलेल्या जळगावमध्ये 24 कॅरट सोन्याचे भाव 51 हजार 225 प्रति ग्रॅम आहे. तर चांदी भाव 68 हजार 807 रुपये प्रति किलो आहे. सोन्याचा भाव जरी वधारला असला तरी देखील गुढीपाडवा असल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत असल्याचे पहायला मिळत आहे. आज सराफा बाजारात मोठी उलाढा होण्याची अपेक्षा सराफा व्यावसायिकांना आहे.
हे पण वाचा :
जळगावात काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये धुसफूस? काँग्रेस आमदारासमोरच काँग्रेसचा माजी नगरसेवक राष्ट्रवादीत
भुसावळात तीन कंटेनरमधून तब्बल सव्वा दोन कोटीचा गुटखा जप्त
महाराष्ट्र सरकारमध्ये ‘या’ पदांवर सरकारी नोकरीची संधी..243 पदे रिक्त