मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये धुसपूस पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या गृहखात्यावर शिवसेना नाराज असून आता स्वतःकडे गृहखाते असावे अशी शिवसेनेची इच्छा असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांवर एकामागून एक ईडी कारवाई होत असताना गृहखात्याने मात्र आक्रमक भूमिका घेतली नाही असे शिवसेनेचे म्हणणं आहे. भाजप नेत्यांविरोधात पुरावे देऊनही कारवाई होत नसल्याने शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेला आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले गृहखाते हवं आहे अशी माहिती समोर येत आहे.
हे पण वाचा :
संतापजनक ! व्हिडीओ चित्रीकरण करून ६ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार
पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना दिला परीक्षेसाठी खास मंत्र, म्हणाले..
बॅग भरा, तयारी करा…; आघाडीतील दोन मोठ्या नेत्यांबाबत सोमय्यांचे महत्वाचे ट्विट
महागाईचा झटका : एलपीजी गॅसच्या दरात मोठी दरवाढ
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांविरोधात ईडी ने फास आवळला आहे. एवढंच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे म्हेवणे पाटणकर हे सुद्धा ईडी च्या रडारावर आहेत. अशा परिस्थितीत गृह खात्याकडून आक्रमकपणे भाजपवर प्रतिहल्ला झाला नाही त्यामुळे शिवसेना भाजपवर नाराज असल्याचे समजत आहे.