नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी परीक्षेबाबत चर्चा करत आहेत दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जिथे पंतप्रधान मोदी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. या कार्यक्रमासाठी 15 लाखांहून अधिक पालकांनी नोंदणी केली असून कार्यक्रमादरम्यान 20 मुले पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारतील.
परीक्षेवर चर्चा पंतप्रधान मोदींचा आवडता कार्यक्रम
परीक्षेवरील चर्चेच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘हा माझा अतिशय आवडता कार्यक्रम आहे, पण कोरोनामुळे मी तुमच्यासारख्या माझ्या सहकाऱ्यांना मध्येच भेटू शकलो नाही. आजचा कार्यक्रम माझ्यासाठी विशेष आनंदाचा आहे, कारण बऱ्याच कालावधीनंतर मला तुम्हा सर्वांना भेटण्याची संधी मिळत आहे.
अनुभवाला तुमची ताकद बनवा: पंतप्रधान मोदी
पीएम मोदी म्हणाले, ‘परीक्षा सणांच्या दरम्यान होतात. त्यामुळे मुलांना सणांचा आनंद घेता येत नाही, पण परीक्षेला सण बनवलं तर त्यात अनेक रंग भरतात. ते पुढे म्हणाले, ‘परीक्षा हा जीवनाचा सोपा भाग आहे, असा निर्णय मनातून घ्या. आपल्या विकासाच्या प्रवासातील हे छोटे टप्पे आहेत. यापूर्वीही आपण या टप्प्यातून गेलो आहोत. यापूर्वीही आम्ही अनेकवेळा परीक्षा दिली आहे. हा आत्मविश्वास निर्माण झाला की, हाच अनुभव येणार्या परीक्षेसाठी तुमची ताकद बनतो.
परीक्षेवरील चर्चेची 5वी आवृत्ती
हा कार्यक्रम गेल्या चार वर्षांपासून शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे आयोजित केला जात असून परीक्षा पे चर्चाची ही पाचवी आवृत्ती आहे. 2018 मध्ये सुरू झालेल्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना पंतप्रधानांसोबत त्यांचे विचार मांडण्याची संधी मिळते. याशिवाय पीएम मोदी आपले अनुभव विद्यार्थ्यांसोबत शेअर करतात आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही देतात.