नवी दिल्ली : आज एक एप्रिल 2022 चालू आर्थिक वर्षाचा पहिला दिवस, आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका बसला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज व्यवसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल 250 रुपयांची वाढ केली आहे. तर घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल झाला नाही.
निवडणूका संपल्यानंतर पुन्हा एकदा सर्वसामान्य जनतेचे महागाईने कंबरडे मोडले आहे. १० दिवसांपूर्वीच घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली होती. तर, एकीकडे २२ मार्च रोजी व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाला होता. मात्र आज नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशीच व्यावसायिक सिलिंडरच्या दरातही मोठी दरवाढ करण्यात आली आहे.
दरवाढीपूर्वी मुंबईत व्यवसायिक सिलिंडरची किंमत 1,995 इतकी होती. व्यवसायिक गॅस सिलिंडरचे दर वाढल्याने महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.