मुंबई, : राज्यातील वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला असला तरी आता नवं संकट राज्यावर घोंगावत आहे. पुढील दोन दिवस संकटाचे असल्याचं वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, हे राज्य अंधारात बुडू देणार नाही. विजेच्या क्षेत्रात सर्कस करावी लागते. पुढचे 2 दिवस कठीण आहेत. दोन दिवस कोळशाचा पुरवठा होऊ शकला नाही, त्याचे परिणाम होऊ शकतात. पण भारनियमन होणार नाही. गरज पडली तर पॉवर एक्सचेंजमधून वीज विकत घेऊ.