मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत असताना देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलची दर वाढ सुरुच असून आज (सोमवार) 28 मार्च रोजी पेट्रोल प्रतिलिटर ३० पैशांनी तर डिझेल ३५ पैशांनी महागलं आहे. 22 मार्च ते 28 मार्चपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 4 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
भारतीय पेट्रोलियम विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या ताज्या अपडेटनुसार, देशाची राजधानी दिल्लीत आज (सोमवार) म्हणजेच 28 मार्च 2022 रोजी पेट्रोलची किंमत 99.41 रुपये प्रति लिटर तर डिझेलची किंमत 90.77 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे. . दिल्लीत पेट्रोलचे दर आता शतकाच्या जवळ पोहोचले आहेत. तर इतर सर्व प्रमुख महानगरांमध्ये 100 रुपयांच्या पुढे पेट्रोलची विक्री होत आहे.
मुंबई मध्ये पेट्रोल 30 पैशांनी तर डिझेल 35 पैशांनी महागल आहे. मुंबईतील पेट्रोलचा दर 114.19 रुपये तर डिझेलचा दर 98.50 रुपये इतका आहे. जळगाव जिल्ह्यात काल डिझेल 97.67 तर पेट्रोल 114.91 रुपयांनी विकलं जात होतं. तर आज 30 ते 35 पैशांची वाढ झाल्यानं डिझेल 98.03 रुपये तर पेट्रोल 115.22 रुपयांनी विकलं जातंय.