जळगाव,(प्रतिनिधी)- हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी दोन दिवसाआधी वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती या वक्तव्याने राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले दरम्यान आज जळगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे यांच्या नेतृत्वात आमदार संतोष बांगर यांच्या प्रतिमेला ‘जोडा मारो’ आंदोलन करत प्रतिमेच्या बॅनरचे दहनही यावेळी केल्याने जळगावा देखील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसले.
शिवसेनेचे आमदार संतोष बांगर नेमकं काय म्हणाले…
मागच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एक हजार कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप हिंगोलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख व आमदार संतोष बांगर यांनी केला आहे.हिंगोलीत शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरू आहे. यानिमित्त जवळा बाजार येथे झालेल्या मेळाव्यात त्यांनी हा आरोप केला.
संतोष बांगर म्हणाले, मतविभाजन करणे हे भाजपचे धोरण आहे. त्यासाठीच त्यांनी एमआयएमला महाविकास आघाडीत सामील होण्यासाठी पुढे केले असणार. गेल्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितचा त्यासाठीच वापर केला गेला होता. त्यासाठी एक हजार कोटी रुपये दिले गेले होते. वंचितसुद्धा भाजपची टीम असल्याचा आरोपही बांगर यांनी केला होता.
जळगावातील आंदोलन यांची होती उपस्थिती…
युवा जिल्हाध्यक्ष जितेंद्र केदार, उपजिल्हाध्यक्ष डिगंबर सोनवणे, युवा जिल्हा महासचिव यशराज पाटील, महानगरध्यक्ष दीपक राठोड, युवा उपजिल्हाध्यक्ष ललित घोगले, युवा प्रसिद्धी प्रमुख राहुल सुरवाडे, जिल्हा संपर्क प्रमुख आधार कांबळे, महानगर सचिव प्रविण इंगळे, रवींद्र निकम, अतुल पवार सागर केदार, प्रसाद महाजन, दीपक नन्नावरे, विक्की सोनवणे, विजय अहिरे, दीपक सोनवणे, विशाल सोनवणे संदीप देवरे, राहुल तायडे, भूषण बिऱ्हाडे, चेतन सपकाळे, जितू वानखेडे आदी उपस्थित होते.