पाचोरा – पाचोरा -भडगाव मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार नरेश पाटील यांनी आज दि.4 रोजी शक्तिप्रदर्शन करीत नामांकन अर्ज दाखल केला.
नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी शहरातील जारगाव चौफुली पासुन ते शिवाजी चौकापर्यंत जोरदार शक्तिप्रदर्शन करून रॅली काढण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद इंगळे, तालुक्याचे तसेच वंचितचे जेष्ठ नेते आण्णा मोरे, वंचीतचे अधिकृत उमेदवार नरेश पाटील, भिमराव खैरे, रोहित ब्राम्हण, याच्या सह ग्रामीण भागातील व शहरी भागातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.रॅली नंतर पाचोरा प्रांत अधिकारी राजेन्द्र कचरे याच्या कडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.