Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नीती आयोगातर्फे महाराष्ट्रातील ‘या’११ महिलांना ‘भारत बदलणाऱ्या महिला’ पुरस्कार

najarkaid live by najarkaid live
March 22, 2022
in राज्य
0
नीती आयोगातर्फे महाराष्ट्रातील ‘या’११ महिलांना ‘भारत बदलणाऱ्या महिला’ पुरस्कार
ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिल्ली, दि. 22 :  विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या महिलांना ‘भारत बदलणाऱ्या महिला’ (Women Transforming India)  या पुरस्काराने नीती आयोगातर्फे सोमवारी सायंकाळी सन्मानित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राच्या 11 महिलांचा समावेश आहे. देशातील एकूण 75 महिलांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

नीती आयोगाच्या वतीने ‘भारत बदलणाऱ्या महिला’ (Women Transforming India)  या 5 व्या पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले.  हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे विविध क्षेत्रातील प्रशंसनीय कार्य करणाऱ्या  75 महिलांना गौरविण्यात आले. याप्रसंगी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार स्वरूप मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात आले.

‘भारत बदलणाऱ्या महिला’ या पुरस्काराचे वितरण सुप्रसिद्ध महिलांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये  माजी पोलीस महासंचालक तथा पुदुचेरीच्या माजी राज्यपाल किरण बेदी, माजी सहायक महासचिव संयुक्त राष्ट्र लक्ष्मी पुरी, डीआरडीओच्या एरोनॉटीकल सिस्टमच्या महासंचालक डॉ. टेसी थॉमस, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजी अध्यक्ष अरूंधती भट्टाचार्य, नॅसकॉमच्या अध्यक्षा देबजानी घोष, अभिनेत्री आणि लोक गायिका  इला अरूण,  यासह ट्रॅक आणि फिल्ड ऍथलीट शायनी‍ विल्सन, टोक्यो ऑलिम्पिक  विजेती मुष्ठियोध्दा लवलीना बोरगोहेन, जागतिक प्रथम क्रमांची पॅरा बॅडमिटंनपटू मानसी जोशी, टोक्यो ऑलिम्पियन जिम्नॅस्ट प्रणीती नायक, मुष्ठियोध्दा सिमरनजित  कौर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

महाराष्ट्रातील 11 महिलांना ‘भारत बदलणाऱ्या महिला’ पुरस्कार

मुंबईच्या डॉ. अर्पणा हेगडे, या अरमान नावाने अशासकीय संस्था चालवितात. या संस्थेच्या वतीने गर्भवती माता, नवजात अर्भक आणि पाच वर्षापर्यंतच्या बालकांची काळजी घेतली जाते.  आतापर्यंत 27 लाख महिला आणि बालकांना त्यांनी आवश्यक ती मदत पुरविली आहे. ही संस्था 19 राज्यात काम करते. केंद्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या किलकारी आणि मोबाईल अकादमी या प्रकल्पांची प्रत्यक्ष अमलबाजवणी अरमानच्या माध्यमातून केली जाते. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले.

नागपूर जिल्ह्यात क्रांती ज्योती महिला बचत गट (रूलर मार्ट)चालविणाऱ्या दिपा चौरे आहेत. यांच्या बचत गटाच्यामाध्यमातून  ग्रामीण भागात उच्च गुणवत्तेचे उत्पादने तयार केली जातात.  त्यांनी 350ते 500 महिलांना यामाध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

माणदेशी महिला सहकारी बँकेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकरित्या सक्षम करणाऱ्या चेतना गाला सिन्हा यांनाही सन्मानित करण्यात आले.  या बँकेचे लक्ष्य वर्ष 2024 पर्यंत 10 लाख महिलांपर्यंत पोहोचण्याचे आहे.

मुंबईतील रीसिटी नेटवर्क प्रा. ली. च्या मेहा लाहीरी या स्वच्छता यावर काम करतात. प्लास्टिक कचरा हे आजचे आव्हान असून त्याशी निगडीत काम करणाऱ्या कामगारांचे समुपदेशन, त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करतात. संस्था स्थापनेपासून  69% पेक्षा जास्त महिला कचरा कामगारांवर संस्थेने केलेल्या कामाचा सकारात्मक परिणाम झाला आहे. त्यांच्या याइकामाची दखल घेत त्यांना ‘भारत बदलणाऱ्या महिला’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुणे येथील स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या प्रेमा गोपालन यांनाही सन्मानित करण्यात आले. त्या पुरस्कार स्वीकारायला येऊ शकल्या नाही पंरतु त्यांच्या संस्थेच्या प्रतिनिधीने हा पुरस्कार स्वीकारला.  त्यांनी संस्थेच्या माध्यातून बदलत्या नैसर्गिक वातावरणानुसार ग्रामीण भागात महिलांना शेती करण्याचे प्रशिक्षण दिले.  त्यांची संस्था महाराष्ट्र, केरळ, बिहार, ऊडीसा या राज्यांतही काम करते.  त्यापर्यंत त्यांनी  150,000 ग्रामीण महिला शेतकऱ्यांना  प्रशिक्ष‍ित केलेले आहे.

पुण्यातील आद्या ओरीजनल्स प्रा. लि. संस्थेच्या सायली मराठे यांना त्यांच्या ऐतिहासिकपण जपणाऱ्या चांदीच्या दागिने बनविण्याच्या कामासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

मुंबईच्या शांती राघवन या अनऐबल  इंडिया अशासकीय संस्थेच्या माध्यमातून  दिव्यांगासाठी मागच्या 2 दशकांपासून काम करतात. देश घडविण्यात दिव्यांगांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांच्याकडून मिळणाऱ्या करातून नवनवीन प्रकल्प उभारले जातात. दिव्यांगाचे अस्तित्व अन्यसारखेच महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित त्या करीत असतात. त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांनाही  ‘भारत बदलणाऱ्या महिला’ या पुरस्काराने सन्‍मानित करण्यात आले.

मुंबईतील टिच फॉर इंडिया आणि द आकांक्षा फाउंडेशन च्या माध्यमातून शाहीन मिस्त्री या वर्ष 2008 पासून शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट शिक्षण मिळावे यासाठी काम करीत आहेत.  आजपर्यंत या संस्थेने 32,000 मुलांना टिच फॉर इंडियाच्या माध्यमातून शिक्षित केले आहे. अप्रत्यक्षपणे  33 दक्षलक्ष बालकांपर्यंत ही संस्था पोहोचली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले मात्र त्या उपस्थित राहू शकल्या नाही.

पुण्याच्या सुलज्जा मोटवानी यांनी  प्रदुषण नियंत्रण आणि पर्यावरण सरंक्षण व्हावे यासाठी  काइनेटिक ग्रीन एनर्जी ऍण्ड पावर सोलुश्यन या कपंनीच्या माध्यमातून प्रदूषण कमी करणारे सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरात असणारे वाहन तयार केले. या वाहनाची किंमतही परवडण्यासारखी ठेवली.  त्यांचा लाभ लोकांना होत आहे. यामाध्यमातून आतापर्यंत 50 हजार लोकांना रोजगार मिळालेला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना सन्मानित करण्यात आले. मात्र त्या या कार्यक्रमास उपस्थित राहू शकल्या नाहीत. यासह मुंबईच्या फुट डॉक्टर पायांची निगा कशी राखायची बद्दलची माहिती कलर मी मॅड प्रा. ली. कंपनीच्या माध्यमातून त्रिशला सुराणा देत असतात. यांना आणि मुंबईच्याच ओखई या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण कारागिरांना रोजगार देणाऱ्या किर्ती पुनिया यांनाही सन्मानित करण्यात आले मात्र, याही कार्यक्रमात उपस्थित होऊ शकल्या नाहीत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जलसंधारण, पर्यावरण रक्षणाची गरज- आरिफ शेख

Next Post

बालगंधर्व नाट्यगृहाचा कायापालट करणार – महापौर जयश्री महाजन

Related Posts

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

महापुरुष डॉ. आंबेडकर’ माहितीपट आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर: द अनटोल्ड ट्रूथ’ चित्रपटाचे १४ एप्रिल रोजी प्रसारण

April 10, 2025
भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

भयानक कृत्य! खेळणे देण्याचे आमिष देऊन घरी घेऊन जात १० मुलीवर लैंगिक अत्याचार करून ठार मारले

April 9, 2025
लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

लग्नाला आठ दिवस बाकी असतांना होणाऱ्या जावयासोबत सासू सैराट

April 9, 2025
धक्कादायक ;  ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

धक्कादायक ; ५ वी ६ वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात अंमली पदार्थ,कंडोम, फायटर आणि धारदार चाकू!

April 9, 2025

‘या’ दिवशी जन्मलेल्या राज्यांमधल्या मुलींच्या नावाने १० हजार रुपये बँकेत जमा होणार

April 2, 2025
धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

धक्कादायक ; सुनेनं सासूचा खून करून मृतदेह पोत्यात भरला,अन् तेवढ्यात….

April 2, 2025
Next Post
बालगंधर्व नाट्यगृहाचा कायापालट करणार – महापौर जयश्री महाजन

बालगंधर्व नाट्यगृहाचा कायापालट करणार - महापौर जयश्री महाजन

ताज्या बातम्या

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठं ठेवा – शिवकुमार एस

May 5, 2025
आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

आंबा बाजारातील ग्राहकांची फसवणूक!

April 28, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुस्लिम समुदायाकडून निषेध ; इस्लाम धर्म हा दहशतवादी नव्हे

April 28, 2025
हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

हृदय आणि आत्म्याला बलवान करण्यासाठी ज्ञानमार्गाचा अवलंब करा : डॉ.  सुदर्शन अय्यंगार

April 28, 2025
जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

जळगावात मुस्लिम बांधवांकडून पाकिस्तानचे झेंडे फाडून निषेध

April 28, 2025
कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

कृषिक्षेत्रातील नकारात्मकता तंत्रज्ञानातून दूर करा!

April 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us