जळगाव – माजीमंत्री गुलाबराव देवकर यांचे चिरंजीव विशाल देवकर यांनी आज अनपेक्षितपणे आपला राष्टवादी आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीकडून धरणगावच्या नगराध्यक्षा पुष्पक महाजन यांना पक्षाने तिकीट जाहीर केले असल्याने आज अचानक विशाल देवकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करून खळबळ उडवून दिली आहे. यावेळी धरणगावचे माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे, तालुकाध्यक्ष धनराज माली, जळगाव तालुकाध्यक्ष बापू परदेशी , माजी तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील निलेश चौधरी, नितीन पाटील, धीरज पाटील, अरविंद देवरे, नारायण चौधरी, लक्ष्मण पाटील, विजय पाटील,राहुल पाटील, अमोल सोनार, मधुकर पाटील, अनिल पाटील, नवल पाटील आदी उपस्थित होते .