सोशल मीडिया हे एक असे व्यासपीठ आहे, जिथून लोक रातोरात जगभर प्रसिद्ध होतात. प्रत्येकजण त्या व्यक्तीला ओळखतो. प्रसिद्ध होण्यासाठी लोक अनेकदा धोकादायक स्टंट करतात, ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण तीन धोकादायक कोब्रा सापांशी खेळताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओने लोकांना आश्चर्यचकित केले आहे की, एखादी व्यक्ती आपल्या जीवाशी असे कसे खेळू शकते.
हा व्हायरल व्हिडिओ कर्नाटकचा असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण तीन किंग कोब्रासोबत स्टंट करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, मात्र व्हिडिओच्या शेवटी आश्चर्यकारक गोष्टी पाहायला मिळतात. किंग कोब्रासोबत स्टंट करणाऱ्या तरुणाचे नाव मेजर सय्यद असल्याची माहिती मिळत आहे. सय्यद तीन किंग कोब्रांसोबत व्हिडिओ शूट करताना दिसत आहे.
This is just horrific way of handling cobras…
The snake considers the movements as threats and follow the movement. At times, the response can be fatal pic.twitter.com/U89EkzJrFc— Susanta Nanda (@susantananda3) March 16, 2022
तरुण तीन कोब्रा सापांना एका रांगेत बसवतो. यानंतर, तो सर्वात लहान कोब्राची शेपटी पकडतो आणि त्याला त्याच्याकडे खेचतो आणि त्याच्या शेपटीला स्पर्श करतो. यानंतर, तीन किंग कोब्रांसमोर बसलेला तरुण हात पाय हलवतो. यावरून तो सापांना स्वतःचे अनुकरण करण्यास सांगत असल्याचे दिसते.तो तरुण दुसऱ्या कोब्राला पकडण्याचा प्रयत्न करताच सर्वात मोठा किंग कोब्रा त्याच्या पायावर हल्ला करतो. यानंतर तरुणाने कोब्राला हाताने पकडले आणि कोब्राला सोडवण्याचा प्रयत्न केला. साप चावल्यानंतर तरुणाला रुग्णालयात दाखल करावे लागले. कोब्राने चावलेल्या तरुणाच्या पायाची त्वचा निळी झाली.
आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट ट्विटरवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने या व्हिडिओसह आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की कोब्राचा सामना करण्याचा हा सर्वात धोकादायक मार्ग आहे. त्याने लिहिले आहे की साप आपल्या जवळच्या हालचालींना धोका मानतो.