पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रीकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. पणजी मतदारसंघातील प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपचे बाबुश मोन्सेरात विजयी. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतील मोठं यश आलं.
उत्पल पर्रीकर यांचा 710 मतांनी पराभव झाला आहे. भाजपचे बाबुश मोन्सरात यांनी त्यांना पराभवाचा झटका दिला आहे. उत्पल पर्रीकर यांनी भाजप विरोधात बंड पुकारत पणजीतून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. अन्य पक्षांनी देखील उत्पल यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे उत्पल पर्रीकर बाजी मारणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला.
हे देखील वाचा :
रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय, आता आरक्षणशिवाय करता येणार रेल्वे प्रवास
Video ! उर्फी जावेदने पुन्हा दाखवली बोल्ड स्टाईल आणि म्हणाली..’मी आवरा’, मग चाहते म्हणाले- कडक!
युक्रेनवरील हल्ल्यादरम्यान रशियाची मोठी घोषणा, ‘या’ निर्णयामुळे आता सोने होणार स्वस्त
उत्पल पर्रीकर यांनी पणजीतून निवडणूक लढवल्या नंतर गोव्यात राजकीय रंगत आली होती. उत्पल पर्रीकर यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप विरोधी पक्षांना आवाहन केले आहे. पणजीतून उत्पल पर्रीकर हेच विजयी होतील असा दावा संजय राऊत हे सातत्याने करत होते. मात्र त्यांचा हा दावा फोल ठरला आहे. गोव्यात आत्तापर्यंत हाती आलेल्या कला नुसार भाजप 19 तर काँग्रेस 12 जागांवर आघाडीवर आहे. मगोप ला 5 जागांवर आघाडी मिळाली असून आम आदमी पार्टी 1 जागांवर आघाडी आहे.