- कार्यकर्ते, समर्थकांची मोठी गर्दी : शक्तिप्रदर्शन जोरात


रावेर-(प्रतिनिधी) रावेर मतदार संघातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वतीने माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी मोठ्या संख्येने मतदार संघातील कार्यकर्ते, समर्थक, पक्षाचे पदाधिकारी उपस्थितीत होते.अर्ज दाखल करण्यापूर्वी जोरदार घोषणाबाजी देत शक्तीप्रदर्शन करण्यात आले.