नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम भारतातील सोने दरावरही होत आहे. गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सोने ५३ हजारांवर गेले आहे. तर चांदीने ७१ हजाराचा टप्पा ओलांडला आहे. दरम्यान, आज सोने दरात वाढ झाली असून चांदीचा दर कमी झाला आहे.
आज भारतात 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमसाठीचा दर 53,890 रुपये आहे. तर 22 कॅरेटसाठीचा दर 49400 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे.
सोन्यासह चांदीचा भावही सतत वाढता आहे. परंतु आज चांदीचा भाव उतरला आहे. एक किलो चांदीचा भाव 70000 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे. काल सोमवारी एक किलोग्रॅम चांदीचा भाव 71000 रुपये होता.
रशिया – युक्रेनमधील युद्धामुळे जगभरातील आर्थिक बाजारपेठांमध्ये निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे गुंतवणुकदार जोखमीच्या पर्यायांमध्ये गुंतवणूक टाळत आहेत. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे मोठा कल आहे. युद्धामुळे अनेक गुंतवणुकदारांनी गोल्ड ETF मध्ये मोठी गुंतवणूक केली, त्यामुळे सोने दरात आणखी मजबूती आली आहे.
हे देखील वाचा :
खळबळजनक ! प्रेमसंबंधाच्या संशयाने मुक्तळ ग्रा. पं. सदस्याचा खून
शिवसेनेला आणखी एक धक्का : आदित्य ठाकरेंच्या ‘या’ निकटवर्तीयावर आयकर विभागाचा छापा
विधानसभेत गिरीश महाजनांची डुलकी, शेलारांनी खुणावताच…? व्हिडीओ व्हायरल
31 मार्चपूर्वी पूर्ण करा ‘ही’ 5 कामे, अन्यथा बसेल भुदंड, जाणून घ्या
कशी तपासाल सोन्याची शुद्धता –
तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवलं आहे. ‘BIS Care App’ द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.