नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असणारी मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू सैराट फेम आर्चीने काही तासापूर्वीच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे त्यात आर्चीने जब सैयां आये शाम को तो लग गये चाँद मेरे नाम को जब सैयां आये शाम को तो लग गये चाँद मेरे नाम को सर पे रखके नाच फिरी मैं हर जलते हुए इलज़ाम को जब सैयां … या ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटातील गाण्यावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारे ‘एक्सप्रेशन’ दिले आहेत, व्हिडीओ पाहून चाहतेही थक्क झाले आहे.
सैराट मराठी चित्रपटातून लोकप्रियता मिळवलेल्या अभिनेत्री रिंकू राजगुरुने नंतरच्या काळात कागर, मेकअप आणि आता झुंड चित्रपटात सुपर कामगिरी केली असून उत्तम अभिनयशैली आणि पडद्यावर वावरताना तिच्यातील साधेपणा यामुळे रिंकू अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे आज काही तासापूर्वीच रिंकूने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
https://www.instagram.com/reel/CayvFWND1wH/?utm_source=ig_web_copy_link
दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांनी मुंबईच्या कामाठीपुरा परिसरातील एका गंगू नामक महिलेची कथा त्यांच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ सिनेमात सांगितली आहे. देहविक्री व्यवसाय करणाऱ्या गंगूची ही गोष्ट. त्या महिलेची किंबहुना देहविक्री करणाऱ्या त्या प्रत्येक मुलीची, स्त्रीचीच ही कहाणी आहे. हुसेन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर प्रेरित ‘गंगुबाई काठियावाडी’ हा सिनेमा आहे.
एका व्यावसायिक सिनेमाला आवश्यक त्या सर्व गोष्टी या सिनेमात खच्चून भरलेल्या आहेत. अॅक्शन, नाच-गाणं, देदिप्यमान सेट, नाट्य आणि रोमान्स सर्व काही या सिनेमात आहे. त्यामुळे सिनेमा कंटाळवाणा वाटत नसल्याने प्रेक्षकांनी चित्रपटाला चांगली पसंती दिली आहे.