मुंबई: राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु आहे. यावेळी बीडमधील जिल्हाधिकारी कार्यालयातील गोळीबार प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला अक्षरश: घेरण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, विधानसभेत देवेंद्र फडणवीस बोलत असताना त्यांच्याच पाठी बसलेले भाजपचे नेते गिरीश महाजन डुलकी घेत असतानाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावेळी त्यांच्या शेजारी बसलेल्या आशिष शेलारांनी महाजन यांना हाताच्या कोपऱ्याने खुणावत झोपेतून जागे केले. त्यामुळे महाजन खडबडून जागे झाले आणि त्यांनीही फडणवीस यांच्या सुरात सूर मिसळला.
हे देखील वाचा :
जळगाव जिल्ह्यात बेमोसमी पावसाची शक्यता
BSNL चा नवीन प्लॅन, 197 रुपयांमध्ये 100 दिवसांच्या वैधतेसह मिळेल दररोज 2GB डेटा
.. तोपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील; देवेंद्र फडणवीसांचा इशारा
31 मार्चपूर्वी पूर्ण करा ‘ही’ 5 कामे, अन्यथा बसेल भुदंड, जाणून घ्या
देवेंद्र फडणवीस विधानसभेत बीडच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलत होते. बीडची कायदा आणि सुव्यवस्था किती खराब झाली आहे. याबाबतची सत्तारुढ पक्षाच्या सदस्यांची तळमळ बघावी. बीडमध्ये सत्ता रुढ पक्षाशी संबंधित पदाधिकारी हे तिथे गोळीबार करतात. यात सांगितलं. कौटुंबीक कारणाने. पण कौटुंबीक कारणाने नाही, अध्यक्ष महोदय जिल्हाधिकारी कार्यालयात गोळीबार होतो… असं फडणवीस पोटतिडकीने बोलत होते. दुसरीकडे मात्र, त्यांच्या पाठी बसलेले गिरीश महाजन डुलकी घेत असल्याचं दिसत होतं. महाजन डुलकी घेत असतानाच शेलार यांनी त्यांना कोपराने खुणावलं. तेव्हा महाजन खडबडून जागे होतात आणि सत्ताधाऱ्यांना जाब विचारू लागतात. त्यानंतर शेलार हाताची अॅक्शन करून गोळीबार असं म्हणताना या व्हिडीओत दिसत असून त्यावर नेटकरी मजेशीर प्रतिक्रियाही व्यक्त करत आहेत.