चंदीगड : पंजाबमधील अमृतसर येथे असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) मुख्यालयात एका जवानाने रागाच्या भरात येऊन बीएसएफ मुख्यालयात गोळीबार केला आहे. या घटनेत गोळी झाडणाऱ्या जवानासह 5 जवानांचा मृत्यू झाला आहे. जखमी जवानावर साथीदार उपचार घेत आहेत. त्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर गोळी झाडणाऱ्या जवानाने स्वत:वर गोळी झाडली. त्यानंतर त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचाही मृत्यू झाला. गोळीबार करणाऱ्या आरोपी जवानाचे नाव महाराष्ट्रातील सुतप्पा असे आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ओव्हरटाइम ड्युटीमुळे हा जवान मानसिक तणावातून जात होता. एका वृत्तानुसार, ड्युटीच्या वेळेवरून जवानाचा आपल्या अधिकाऱ्यांशी वाद झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या जवानाने रविवारी आवारात गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि इतर सैनिक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावू लागले.
या घटनेत ५ जवानांचा मृत्यू झाला असून सुमारे डझनभर सैनिक जखमी झाले आहेत. दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, या ५ मृत्यूबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
हे देखील वाचा :
रशिया-युक्रेन युद्धदरम्यान आली आनंदाची बातमी, खाद्यतेल महागणार नाही!
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंबाबत मोठा गौप्यस्फोट
पीएम किसानचा 11 वा हप्ता ‘या’ तारखेला येईल! पहिले करावं लागेल ‘हे’ काम
बारावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये चूक; विद्यार्थ्यांना मिळणार ‘इतके’ गुण
सकाळी उठल्याबरोबर चहा पिताय? जाणून घ्या हे ५ नुकसान