पुणे: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर भाजपकडून मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपची ही मागणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फेटाळून लावत भाजपवर निशाणा साधला आहे
शरद पवार म्हणाले, एखाद्या मुस्लिम कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांला अटक केली तर त्याचा संबध दाऊदशी जोडणे हे चुकीचे आहे. मलिक हे मुस्लीम आहेत म्हणून त्यांचा दाऊदशी संबंध जोडला जातो. मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पण सिंधुदुर्गचे माझी सहकारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाली तेव्हा भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी का केली नाही, असा सवाल पवारांनी यावेळी उपस्थित केला.
हे देखील वाचा :
मोठी बातमी ! कवयित्री बहिणाबाई चौधरी उमविच्या कुलगुरूपदी डॉ विजय माहेश्वरी
अवकाळीचे संकट ! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
SBI ने जारी केला अलर्ट ! KYC च्या नावावर आलेल्या लिंक्सद्वारे होऊ शकेल फसवणुक
होळीनिमित्त रेल्वेकडून प्रवाशांना मोठी भेट, ‘या’ विशेष ट्रेन धावणार, पाहा संपूर्ण यादी
रस्त्यावर कुत्र्यांना खायला घालताय? तर सावध व्हा… ; सर्वोच्च न्यायालयाने घेतला हा निर्णय
मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणात नारायण राणे यांना अटक केली तेव्हा त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकण्याचा भाजपने निर्णय का घेतला नाही ? असाही सवाल शरद पवार यांनी केला. उद्या पंतप्रधान पुण्यात येत आहेत, ते खुलासा करतील. एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय लावण्याचा प्रकार आहे. नारायण राणेंना एक न्याय लावता, दुसरा नवाब मलिकांना दुसरा न्याय लावता, असाच प्रकार असल्याची प्रतिक्रिया पवारांनी यावेळी दिली.