जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. विजय माहेश्वरी यांची निवड जाहीर करण्यात आली आहे.
राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ माहेश्वरी यांची नियुक्ती जाहीर केली.
डॉ. विजय लक्ष्मीनारायण माहेश्वरी हे विद्यापीठातील बायो-केमीस्ट्री या विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी मध्यप्रदेशातील सागर विद्यापीठातून बी.एस्सी. आणि नंतर बायोकेमिस्ट्रीत एम.एस्सी आणि पीएच.डी. संपादन केली आहे. प्रोटीन बायोकेमिस्ट्री, बायो टिश्यू कल्चर आदी त्यांच्या अध्ययनाचे विषय होते. १९९४ साली राष्ट्रीय पातळीवरील यंग सायंटीस्ट पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.