जळगाव : पश्चिम चक्रावातामुळे गेल्या आठवड्यात मध्य प्रदेशासह गुजरातमध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावली हाेती. या चक्रावाताचा परिणाम महाराष्ट्रावर हाेणार असून पुढील आठवड्यात साेमवार ते बुधवारी राज्यावर अवकाळी पावसाचे सावट असेल.
विकेंडनंतर पुढील दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात (IMD alerts) आली आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार, सोमवारी 07 मार्च रोजी पालघर जिल्ह्यात ढगाळ हवामानाची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहे. तसेच याचदिवशी नाशिकसह, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणी विजांचा गडगडाट होणार आहे. त्यामुळे आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अथवा लांबचा प्रवासा टाळावा, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
हे देखील वाचा :
होळीनिमित्त रेल्वेकडून प्रवाशांना मोठी भेट, ‘या’ विशेष ट्रेन धावणार, पाहा संपूर्ण यादी
रस्त्यावर कुत्र्यांना खायला घालताय? तर सावध व्हा… ; सर्वोच्च न्यायालयाने घेतला हा निर्णय
दहावीची तोंडी परीक्षा देऊन परतणाऱ्या विद्यार्थ्यावर काळाचा घाला
डेटा संपलाय आणि पैसे नाहीत? टेन्शन सोडा Jio देणार मोफत इंटरनेट, कसे ते जाणून घ्या
दरवर्षी मार्च महिन्यात येणाऱ्या चक्रावातामुळे उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे सावट असते. यंदाही मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. काढणीला आलेल्या गहू, हरभऱ्यासह रब्बी हंगामातील अन्य पीकांना या वादळी पावसाचा धाेका आहे. वाऱ्यामुळे मका पिकाचे नुकसान हाेण्याची शेतकऱ्यांना धास्ती आहे.