धरणगाव- ना.गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शहराला शुद्ध पाण्याचा पुरवठाचे वितरण करण्याचा शुभारंभ ना गुलाबराव पाटील यांनी केला. यावेळी ना.पाटील म्हणाले, धरणगाव शहराला भेडसावत असलेला जलशुद्धीकरण प्रकल्प काम पूर्ण झाले असून आजपासुन शंभर टक्के शुद्ध पाणी शहराला मिळणार असल्याचे सांगितले. १९६५ पासून ही योजना रखडली असून तत्कालीन ग्रामविकास मंत्री मा आर.आर.पाटील यांनी १९९८ विधानसभेत आवाज उठवल्यावर मजुरी दिली. यानंतर २०१४ मध्ये मुख्यमंत्री मंत्री महोदयांनी चार कोटी चा प्रस्तावास मजुरी देऊन धरणगाव जलशुद्धीकरण काम पूर्णत्वास आले.
नगराध्यक्ष सलीम पटेल यांनी नगरपालिका निवडणुकीचा जाहीरनाम्यात शुद्ध पाण्याचे आश्वासन दिले ते आज पूर्ण झाले. तसेच पावसाळी अधिवेशन झाल्यावर येणाऱ्या अर्थसंकल्पात ७०कोटीचे रस्ते मजूर होणार ७लाखाचा स्वर्गरथ, १७लाखाची रुग्णवाहिका, बस स्टँड सुशोभीकरण, न.प. उद्यान समोरील 30 लाखाच रस्ता, जळगांव ग्रामीण मतदार संघ हा शंभर टक्के डांबरीकरण झाला आहे, असे प्रतिपादन ना गुलाबराव पाटील यांनी केले.
यावेळी शिवसेना जळगांव लोकसभा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी आपल्या मनोगतात राज्यात पाण्याचा प्रश्न गंभीर असून धरणगावत शुद्ध पाण्याचा पुरवठा आजपासून होत असून पाण्याचा वापर जपून करावा तसेच ना.गुलाबराव पाटील यांच्या विकासाचा झंझावात पाहता त्यांची कॅबिनेट मंत्री पदी बढती व्हो आश्या शुभेच्छा दिल्या. यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी जलशुद्धीकरण प्रकल्प संदर्भात माहिती दिली.
यांची होती उपस्थिती
माजी महापौर विष्णू भाऊ भंगाळे, सह संपर्क प्रमुख समाधान पाटील, जळगाव महानगर प्रमुख शरद तायडे, उपनगराध्यक्ष अंजली विसावे, जि प सदस्य गोपाल चौधरी, चांदसर लोकनियुक्त सरपंच सचिन पवार, शिवसेना ता प्रामुख्याने गजानन पाटील, पी एम पाटील, मुख्यधिकारी सपना वसावे, मा. प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, विजय महाजन गटनेते पप्पू भावे, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन यांच्या सह भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे सर्व नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.
यानंतर सहकार राज्य मंत्री यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम पटेल यांच्या घरी जाऊन व सर्व मुस्लिम बांधवांना ईद निमित्ताने शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन भानुदास विसावे यांनी केले तर आभार पी.एम.पाटील यांनी मानले.